उस्मानाबाद, ८ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने वाढत आहे, तरी या वर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील लॉकडाउन हे पुढील ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. या सोबतच कळंब तालुक्यात देखील कोरोनाचा प्रादूर्भाव हा दिवसेंदिवस वाढतच जात होता.
तसेच, कोरोना बाधीत रुग्णांचा अनेक नागरिकांशी संपर्क आलेला होता. या कारणाने सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळंब शहरात कर्फ्यू लागू केला होता. हा कर्फ्यू ३ ऑगस्ट पासून ते उद्या दिनांक ९ ऑगस्ट पर्यंत लागू केलेला आहे.
कळंब मधील वाढत्या कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने नियमानुसार संचारबंदी लागू केलेली आहे. या संचारबंदी मध्ये फक्त दवाखाने, मेडिकल शॉप्स, दूध व पाणी वितरण आणि बँक व्यवहार इत्यादी व्यवस्था चालू ठेवण्यास परवानगी दिली होती.
तरी, या संसर्गाच्या वाढत्या प्रादूर्भावाला गांभीर्याने घेऊन कळंब करांनी या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली आहे. प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कळंबकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करत आहेत.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड.