गोल पोस्ट महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे कडकडीत बंद; जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडेंनी दिले निवेदन

मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे कडकडीत बंद; जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडेंनी दिले निवेदन

माढा, २१ सप्टेंबर २०२०ः टेंभुर्णी ता. माढा येथे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा सुरजाताई बोबडे यांच्या हस्ते करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मंडलाधिकारी मनिषा लकडे व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना देण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे, कोण म्हणते मिळत नाही घेतल्या शिवाय राहणार नाही, अश्या घोषणा देण्यात आल्या.

टेंभुर्णी सह भिमानगर, उजनी, रांझणी, आलेगाव, वडोली,आढेगाव, रूई, चांदज, टाकळी, शिराळ, नगोलीँ, अकोले बु,अकोले खु, वेणेगाव, बेंबळे, मिटकलवाडी, शेवरे या गावात अत्यावशक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील.

error: Content is protected !!
Exit mobile version