गोल पोस्ट महाराष्ट्र हाथरसमधील बलात्काऱ्यांना कठोर शासन करा; राष्ट्रीय चर्मकार संघानं तहसीलदारांना दिलं निवेदन 

हाथरसमधील बलात्काऱ्यांना कठोर शासन करा; राष्ट्रीय चर्मकार संघानं तहसीलदारांना दिलं निवेदन 

इंदापूर दि. १ ऑक्टोबर २०२०: उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात दलित परिवारातील मुलीवर उच्च जातीतील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी सामूहिक बलात्कार केला. गावगुंड फक्त बलात्कार करुन शांत बसले नाहीत तर उलट तिच्या हाता पायाची हाडे तोडली, जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले, त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटक केली. दलित परिवारातील पीडित तरुणीचं वय एकोणीस होतं. ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिला पाळतीवर असलेल्या उच्च जातीतील कुटुंबातील नराधमांनी अजिबात भीती न बाळगता हे कृत्य त्यांनी केले. असल्या नीच व गुंड प्रवृत्तीच्या नराधमांवर कायद्याने फास्ट ट्रॅक न्यायालयात दावा दाखल करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या संघटनेच्या संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत असे नवनाथ शेवाळे यांनी सांगितले.

यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष नवनाथ तानाजी शेवाळे तसेच जिल्हा निरीक्षक संतोष शेवाळे तसेच जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास शेवाळे त्याचबरोबर तालुका महिला अध्यक्षा मनीषा शेवाळे तसेच गणेश माने युवक तालुकाध्यक्ष सचिन सोनवणे, शहर अध्यक्ष ऋषिकेश लोकरे, शहर उपाध्यक्ष जयश्री कांबळे महिला शहराध्यक्ष दत्तात्रय माने तालुका अध्यक्ष इंदापूर तसेच सुहास जालिंदर शेवाळे, शुभम शेवाळे सामाजिक कार्यकर्ते राहुल पोटे आणि बंडू शेवाळे  उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version