पश्चिम मेक्सिकोला भूकंपाचे जोरदार धक्के, तीव्रता ७.६

मेक्सिको, २० सप्टेंबर २०२२: मेक्सिको, अमेरिकेत रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.६ इतकी नोंदवण्यात आलीय. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की लोक घराबाहेर पडले. मात्र, भूकंपामुळं अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ७.६ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळं अनेक इमारती हादरल्या. स्थानिक वेळेनुसार दुपारी १.०५ वाजता भूकंप झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचं केंद्र Michoacán राज्यातील la Placita de Morelos शहरात सांगितलं जात आहे.

स्थानिक मीडियानुसार, राजधानी मेक्सिको सिटीपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. जोरदार भूकंपानंतर सुनामीचा इशाराही जारी करण्यात आलाय.

भूकंपामुळं लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यामुळं लोक घराबाहेर पडले. सुरक्षित जागा शोधू लागले. सुदैवानं, भूकंपामुळं आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

मेक्सिकोच्या कोलिमा राज्यातील एका मॉलमध्ये असलेली एक जिम भूकंपामुळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालीय. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी ट्विट केलं की नौदलाच्या सचिवांनी त्यांना सांगितलं की कोलिमा, मँझानिलो या बंदर शहरामध्ये मॉलची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

महापौर क्लॉडिया शेनबॉम यांनी सांगितलं की, राजधानीत आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. त्याचवेळी, अमेरिकेच्या त्सुनामी चेतावणी यंत्रणेकडून असं सांगण्यात आलंय की, मिचोआकानच्या किनाऱ्याजवळ सुनामीचा धोका आहे.

यापूर्वीही झाला होता १९ सप्टेंबरला भूकंप

अहवालानुसार, अगदी पाच वर्षांपूर्वी १९ सप्टेंबरला मेक्सिकोमध्ये भूकंप झाला होता. यामध्ये ३७० लोकांचा मृत्यू झाला होता. देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर १९८५ मध्येही १९ सप्टेंबरला भूकंप झाला होता. ज्याने मोठा विनाश केला. या आपत्तीत सुमारे ५ हजार लोकांचा मृत्यू झाला.

तैवानमधील भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा

१८ सप्टेंबर रोजी तैवानमध्ये भूकंपाचे तीन भीषण धक्के बसले होते. या भूकंपांच्या पार्श्वभूमीवर जपानने सुनामीचा इशारा जारी केलाय. तैवानच्या हवामानशास्त्र ब्युरोने सांगितलं की, आग्नेय भागात असलेल्या तैतुंग काउंटीमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू दिसत होता. याच भागात शनिवारी ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर दुपारी या ठिकाणी ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्याचा जन्म ताइतुंगच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर अंतरावर झाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा