क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या विडंबनाचा बारामतीमध्ये तीव्र निषेध

बारामती, दि. १६ जुलै २०२०: यवतमाळ येथील येरावर चौकातील क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची व चबुतऱ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी सर्व बाजूने तोडफोड केली आहे. सदर घटनेतील अज्ञात आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे निवेदन महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने उपविभागीय अधिकारी दादासो कांबळे यांना देण्यात आले.

यवतमाळ येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली तसेच पुतळ्याच्या मागील भिंतीलगतची ड्रेनेज सिस्टीमही फोडली आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करून अज्ञात व्यक्तिंविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदर चबूतऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत संबंधित विभागांना योग्य ते आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

यापुढे पुतळ्याची सुरक्षितता अबाधित राहावी या दृष्टीने चोख उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच वारंवार महापुरूषांच्या पुतळयाची विटंबना होऊ नये या बाबत शासनाने कडक कायदा करावा अशी महात्मा फुले समता परिषद बारामती, भाजपा ओबीसी शहर आघाडी बारामती, बारामती ओबीसी आघाडी, जळगाव ग्रामपंचायत, यांच्यावतीने निवेदनात मागणी करण्यात आली आहे. यावेळी सोनूशेठ लोणकर,शिवाजी जाधव,सागर जाधव व समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा