डोंबिवली, २९ ऑगस्ट २०२०: डोंबिवली स्टेशनच्या परिसरात आज ऑल इंडिया रिवॉल्यूटरी स्टूडन्ट संघटनेने ( AIRSO) शांततेत उच्च न्यायालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. परिक्षांपेक्षा सध्या मुलांची सुरक्षा महत्वाची असल्याने परिक्षा रद्द करा, असे यावेळी संघटनेकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर नेट आणि जेईईच्या परिक्षा सूद्धा पुढे ढकला अशी मागणी या विद्यार्थांनी केली आहे.
या आंदोलनात पाच जणांनाच पोलिस परवानगी मिळाल्याने विद्यार्थांनी हातात पोस्टर घेऊन आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही प्रकारची घोषणा न देता विद्यार्थांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनात सात्विक वेळासकर, ओमकार जाधव, आशुतोष जगताप, विनायक प्रभू, अक्षय पाठक, रोहित लाड, अक्षता ठाकूर यांचा सक्रिय सहभाग होता.
लाखो विद्यार्थ्यांच्या वतीने ऑल इंडिया रिवॉल्यूटरी स्टूडन्ट संघटना आज रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे जर मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी दिला. त्यामुळे सातत्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनेक विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या या मागण्या पुर्ण होतात की नाही, त्याचबरोबर राज्य सरकार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाच ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे