औरंगाबाद, १३ जानेवाली २०२३ : नवीन भरतीसंदर्भात ‘एमपीएससी’च्या वेळापत्रकानुसार भरती झालीच पाहिजे, या मागणीसाठी ;तसेच ‘एमपीएससी’चा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी काँग्रेसतर्फे औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू झाला पाहिजे, जुन्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची अभ्यासाची तयारी पूर्ण झाली. त्यामुळे एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून यावेळी करण्यात येत आहे. यासाठी औरंगाबाद येथे औरगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनाले