दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यावरून विद्यार्थ्यांचं आंदोलन, आंदोलनामागं ‘हिंदुस्थानी भाऊ’

मुंबई, 1 फेब्रुवारी 2022: . मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनात हाजारो विद्यार्थ्यांचा उद्रेक दिसून आला. ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलंय. मात्र या उद्रेकाला हिंदुस्तानी भाऊ जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळं हिंदुस्तानी भाऊच्या अटकेची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्रालयाने आदेश दिले आहेत. तसेच या विद्यार्थी आंदोलनाची चौकशी करावी असे देखील आदेश देण्यात आले आहे. या आंदोलनाप्रकरणी हिंदुस्तानी भाऊवर गुन्हा दाखल होणार हे जवळपास स्पष्ट झालंय. हिंदुस्थानी भाऊवर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी चिथावल्याचा आरोप आहे. त्यामुळं हिंदुस्तानी भाऊच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्याता आहे.

https://www.instagram.com/tv/CZWm9DsFK_B/?utm_source=ig_web_button_share_sheet

हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ व्हायरल –

हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर ऑनलाइन परीक्षा घेण्याचा मागणीला पाठिंबा दर्शवणारी पोस्ट शेअर केली होती. तसंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचला होता. यावेळी धारावीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गर्दी केली आणि वर्षा गायकवाड यांच्या घऱासमोर आंदोलन केलं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

https://www.instagram.com/tv/CZYsswsFS31/?utm_source=ig_web_button_share_sheet

दरम्यान सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी तो गाडीत बसला असून बाहेर आंदोलन करणारे विद्यार्थी दिसत आहेत. यावेळी तो सांगत आहे की, “ही या विद्यार्थ्यांची ताकद आहे. वर्षा गायकवाड यांना लवकरात लवकर परीक्षा रद्द करावी, मुलांची शिक्षा माफ करावी यासाठी निवेदन दिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी निवदेन वर्षा गायकवाड यांच्याकडे देऊ असं आश्वासन दिलं आहे. जर इतकं केल्यानंतरही सरकारने ऐकलं नाही तर याच ताकदीने पुन्हा उतरु. हे विद्यार्थी आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. यांना न्याय मिळाला पाहिजे”.

https://www.instagram.com/tv/CZYza9eFPdX/?utm_source=ig_web_button_share_sheet

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा