नांदेड येथे पोलीस भरतीसाठी घोषणा देत विद्यार्थ्यांचा गोंधळ, पोलिसांचा विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठी चार्ज

नांदेड १७ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नांदेड येथे आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी मोठा गोंधळ घातला. पोलीस भरती झालीच पाहिजे ची घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. रखडलेली पोलीस भरती झाली पाहिजे. अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. सदर घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना घेराव घातल्याचे पाहायला मिळत आहे.या घटनेनंतर उपमुख्यमंत्री विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच येथून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहणाची वेळ बदलून सकाळी लवकर ध्वजारोहण करून ते निघून गेले. यावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अपमान आहे, अशी टीका केली होती. त्यावरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे, ते म्हणाले आजच्या दिवशी आरोप करून या दिवसाचे महत्त्व कमी करू नका. तो आजच्या दिवसाचा अपमान ठरेल.

याविषयी बोलताना फडणवीस पुढे म्हणाले हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला तीन राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याचा काही मोह नाही. असे सांगून आजच्या दिवशी राजकारण करू नये असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा