विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट ठेवावे- राजवर्धन पाटील

बावडा (इंदापूर), दि. १७ जुलै २०२०: विद्यार्थ्यांनी इ.१२ वी. पासूनच स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट ठेवून अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून, प्रशासनामध्ये मोठ्या पदावर काम करण्याची संधी १००% निश्चितपणे मिळू शकते, असे प्रतिपादन नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले आहे.

बावडा येथे शुक्रवारी (दि.१७) राजवर्धन पाटील यांनी श्रद्धा कवडे देशमुख हीचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. इ.१२ परीक्षेत श्रद्धा हीने बावडा परीक्षा केंद्रात व जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल अँड कॉलेज मध्ये ९०.६१ टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक मिळविला आहे.तसेच ती क्रॉप सायन्स या विषयात २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम आली आहे.

इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना अडचण आल्यास सहकार्य केले जाईल,असे राजवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी वृषाली महेंद्र कवडे देशमुख हिचाही बारावीतील यशाबद्दल राजवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही श्रद्धा हिचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा