विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये

मुंबई, ३० ऑगस्ट २०२०: दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी उच्च न्यायालयाने शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला. तसेच काल उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये, असाच आमचा प्रयत्न आहे. हे त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

ते म्हणाले आम्ही कुलगुरूंसोबत चर्चा करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात अजूनही कोरोना आटोक्यात आला नाही. त्यामुळे विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलवून परीक्षा घेण्यासाठी सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. असं मत कुलगुरू यांनी उदय सामंत यांच्यासोबत बोलतांना व्यक्त केलं आहे. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची स्थापन केली आहे. या समितीमध्ये दोन संचालक समन्वयाचे काम करतील. ही समिती उद्या कुलगुरू आणि प्राचार्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

तसेच आम्ही सोमवारी पहिला निर्णय जाहीर करू, त्यानंतर ३० सप्टेंबरला परीक्षा घेणं शक्य आहे, की नाही याबाबत माहिती देऊ असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा