‘स्टडी फ्रॉम होम’बाबत पालकांतून संताप; बंद करण्याची मागणी

नाशिक, दि.२१ मे २०२०: कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात शिक्षण विभागाने ‘स्टडी फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. परंतू शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत असलेली अनिश्चितता, अभ्यासक्रमाबाबत नसलेली स्पष्टता त्यातच मे महिना हा प्रत्यक्षात उन्हाळी सुट्टीचा असल्याने ‘स्टडी फ्रॉम होम’बाबत पालक व शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ‘स्टडी फ्रॉम होम’ बंद करा, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना ‘स्टडी फ्रॉम होम’ चे आदेश दिले. त्यानुसार उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षक व मुख्याध्यापकांना पाठांच्या चित्रफिती तयार करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू पुढील शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, अभ्यासक्रम किती असेल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

त्यामुळे कोणत्या पाठांच्या चित्रफिती बनवायच्या, बनवलेल्या चित्रफिती किती उपयोगी पडणार याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, स्मार्ट फोन असण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना कसे शिकवायचे असा शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

तसेच विद्यार्थी ऑनलाईनच्या शिक्षणाच्या नावाखाली मोबाईलचा वापर फोटो, व्हिडीओ, युट्युबवर चित्रपट बघणे, गाणी ऐकणे यासाठीच करतात. त्यातच पालकांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने त्यांना मुलांवर लक्ष ठेवणे अवघड होते.

शिक्षकांना सुट्टीत वर्कलोड देऊ नये. ई-लर्निंग फक्त पर्याय आहे. प्रत्यक्ष उपस्थित शिकवणयाची पद्धती जास्त प्रभावी असते. विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या समाधानची संधी असते. वर्गात त्याला गप्पागोष्टी, चर्चा, सवांद यामार्फत विचार मांडता येतात. ही सर्व बाब लक्षात घेऊन सरकारने सहानुभूतिपूर्वक विचार करून सुट्टीमध्ये मध्ये विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे टाकू नये अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रँटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा