su-30mki मध्ये येणार फिफ्थ जनरेशन ची वैशिष्ट्ये

रशिया: भारताचे सुरक्षा मंत्री रशिया दौऱ्यावर गेले आहेत. या भेटीमध्ये सुरक्षाविषयक उपकरणे व नवीन करार यावर बोलणी होणार होते. एकोणिसावी इंडिया रशिया इंटर गवर्मेंटल कमिशन ओन मिलेटरी अंड मिलिटरी टेक्निकल कॉर्पोरेशन मीटिंगमध्ये रशियाने भारतासाठी वेगवेगळ्या ऑफर ठेवल्या आहेत.
भारताला निरनिराळ्या ऑफर देण्यामागे रशियाचा असा हेतू आहे कि, भारताचा कल अमेरिकेकडे जास्त झाल्याचे रशियाला जाणवत आहे. भारत हा रशियाकडून सर्वात जास्त संरक्षण साधने विकत घेतला आहे आणि रशियाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आला आहे. या सगळ्यांचा विचार करून रशियाने su-30mki या विमानाला पूर्ण अपग्रेड करण्याच्या मसुद्यावर तयारी दर्शवली आहे. यामध्ये एच यु एल द्वारा एक प्रोटोटाइप तयार केले जाईल. su-30mki मध्ये जे काही नवीन उपकरणे व हत्यारे लावण्यात येणार आहेत ते एच यु एल मार्फत केले जाईल व रशिया यामध्ये एच यु एल ला सहाय्य करणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा