खंडवा: भारतीय जनता पक्षाने (भाजपा) राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक अजब विधान केले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होत आहे यावर उपाय म्हणून त्यांनी विचित्र विधान केले आहे. रुपयाची व्हॅल्यू सुधारण्यासाठी त्यांनी विचित्र संकल्पना समोर आणली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की नोटांवर लक्ष्मीची प्रतिमा छापल्यास रुपयाची होणारी घसरण थांबेल.
मध्य प्रदेशच्या खंडवा येथे ‘स्वामी विवेकानंद व्याख्याता’ या विषयावर भाषणानंतर माध्यमांशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, नोटमध्ये संपत्तीची देवी लक्ष्मी यांचे छायाचित्र छापण्याच्या बाजूने ते आहेत.
इंडोनेशियन चलनात भगवान गणेश यांचे छायाचित्र छापण्याच्या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. तथापि, या सर्वांशी मी सामत आहे. इंडोनेशियाच्या चलनावर असलेल्या श्रीगणेशाच्या प्रतिमेमुळे मला कोणतीही अडचण नाही. गणपती विघ्नहर आहे. त्याचप्रमाणे आपल्या भारतीय चलनावर धनाची देवी लक्ष्मी यांची प्रतिमा असावी असे मला वाटते.
या दरम्यान, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर (सीएए) भाष्य केले. ते म्हणाले की नागरिकता दुरुस्ती कायद्यात काही आक्षेपार्ह नाही. यासाठी कॉंग्रेस आणि स्वत: महात्मा गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे आवाहन केले होते.