नवी दिल्ली ५ ऑगस्ट २०२२ : केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वीच केंद्रसरकाडून भेट स्वरूपात महागाई भत्त्यात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसापासून सुरू असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षासंपुष्टात येणार आहे. सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ करून खुशखबर देण्यात आली आहे.
जून महिन्यातील एआयसीपीआय चे आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ होईल असा अंदाज वर्तविला जात होता. त्याची आता घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना यांना याचा लाभ होणार आहे. डीए मध्ये होणारी वाढ ही एआयसीपीआय च्या आकडेवारीवर अवलंबून असते.
एआयसीपीआयच्या पहिल्या सहामाहितीलआकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या आलेखानुसार आता नवीन आकडा ०.२ पॉईंटच्या वेगासह १२९.२ वर पोहोचला आहे. या वाढीमुळे महागाई भत्ता ३४ वरून ३८ टक्के झाला आहे. ही वाढ सप्टेंबर २०२२ च्या पगारापासून लागू होणार आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल कळदकर