हडपसर मध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना जेरबंद करण्यात यश

हडपसर, ४ सप्टेंबर २०२०: दरोड्याच्या टाकण्याच्या तयारीत असलेल्या  तिघांना विधीसंघराशीत अल्पवयीन पाच जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चार लोखंडी कोयते, एक लोखंडी काटवली इत्यादी पोलिसांनी हस्तगत केला आहे.
     

सुभाष धनगर वय २०, श्रीकांत राम शितोळे वय २१, सहील आयुब शेख वय १९ , राहणार सर्व फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हडपसर पोलिसांनी सांगितले की फुरसुंगी रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला शस्त्रसह सात आठ जण आंधारात लपून बसले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली होती.
   

त्यानुसार पोलिस पथकांनी आरोपींना सापळा रचून अटक केली त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशन करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा