मुंबई, १३ सप्टेंबर, २०२२ : यश मिळवण्यासाठी सगळे धडपड करत असतात. पण हेच यश लहान वयात मिळाले तर त्याची हवा डोक्यात जाते आणि त्यामुळे करिअर आणि आयुष्य दोन्ही बरबाद होते. अशीच काहीशी उदाहरणे डोळ्यांसमोर आहेत. त्यांच्या आयुष्याची छोटीशी झलक..
नाव अजमत हुसेन, वय वर्षे ५ .. एका वाहिनीवर त्याने सारेगमप या गाण्याच्या कार्यक्रमात रसिकांनीचे मनं तर जिंकली. पण त्याचबरोबर सलमान खान सारख्या अभिनेत्याचे मन जिंकले. त्यानंतर त्याचे नशीब पालटले. अनेक गाणी, रेकॅार्डिंग आणि पैसे यांचे समीकरण जुळले. हातात पैसा, फेम आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत होती. असं असताना प्रसिद्धी डोक्यात गेली. त्यामुळे वाईट मित्रांची संगत लागली आणि ड्रग्ज, व्यसने यांनी त्याची सोबत केली. परिणामी करिअर संपले. जाणीव झाली तेव्हा सगळं संपलं होतं. हे एक उदाहरण.
नुकत्याच इंडियन आयडॅालमध्ये आलेल्या विनित सिंग याची हीच अवस्था आहे. लहान वयात मिळालेलं फेम त्याला व्यसन आणि नंतर डिप्रेशनच्या साथीने त्याचं आयुष्य वाया गेलं. आता जरी तो जोमाने स्वत:चे करिअर घडवण्याच्या प्रयत्नात असला तरी वेळ पुन्हा येत नसते.
रिॲलिटी शोच्या माध्यमातून फेम पैसा मिळतो. पण जे ते टिकवू शकतो, तोच खरा कलाकार असंच म्हणावे लागेल. अनेक अजमत, विनित झाले असतील पण हे दोघे पुन्हा लढायच्या जोमाने पुढे आले आणि आपली चूक स्वीकारली. हेच त्यांचे धाडस त्यांना नक्की पुढे घेऊन जाईल. हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस