इंदापूर, १ नोव्हेंबर २०२०: इंदापूर शहरानजीक असलेल्या सरस्वती नगर येथील घरामध्ये चिंकारा जातीच्या हरणाला पाय बांधून ठेवलं होतं. त्यास कापण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं आहे.
परमेश्वर अंकुश काळे (वय ३३ वर्षे) राहणार सरस्वती नगर, इंदापूर जिल्हा पुणे अस अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शनिवारी रात्री ३१ ऑक्टोबर रोजी आरोपीनं आपल्या गोखळी- वडापुरी गावच्या हद्दीतील शेताजवळ वनीकरणातील चिंकारा हरणाला सापळा व फास्याद्वारे पकडलं. त्यास सकाळी शहरातील सरस्वती नगर भागातील आपल्या घरी आणून सतुर च्या साह्यानं कापण्याच्या तयारीत असतानाच ही खबर इंदापूर पोलिसांना लागताच त्यांनी तातडीनं त्याच्या घरी धाव घेतली.
या शिकार करणाऱ्या आरोपी परमेश्वर काळेस ताब्यात घेऊन चिंकाराची हत्या न होवु देता सहीसलामत ताब्यात घेतलं. यावेळी हरणाच्या पायाला बांधून ठेवले होते. तर शेजारी सत्तुर देखील पडलेला होता असं पोलिसांनी सांगितलं.
इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह काका पाटोळे, विशाल चौधर, विक्रम जाधव यांनी ही कारवाई केली असून इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान चिंकाराची शिकार झाल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली असून त्यास कत्तल होण्यास पासून वाचवल्यानं फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब व वन विभागानं पोलिसांचे आभार मानले आहेत. तसौच चिंकारा ची शिकार करणाऱ्या आरोपींना जास्तीत जास्त सक्तीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
न्यूज अन प्रतिनिधी निखिल कणसे











































