यशस्वी जीवनातील ‘यशाचा मूलमंत्र’

43

◆आत्मविश्वास : यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा हे तो आत्मविश्वास. आत्मविश्वास असल्यास ती व्यक्ती कधीच अपयशी आणि निराश होणार नाही.

◆मेहनत: मेहनतीचं फळ कधी ना कधी मिळतंच. त्यामुळे आयुष्यात जर पुढे जायचं असेल, यश हवं असेल तर मेहनतीकडे पाठ फिरवू नका. मेहनत करत राहा.

◆ज्ञान: व्यक्तीचं सर्वात मोठं धन असतं ते ज्ञान. जे कुणीच चोरू शकत नाही. ज्ञान हे सदैव, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या सोबत राहतं. यशामध्ये ज्ञानाचा मोठा वाटा असतो

◆पैसा : माणसाला नेहमी पैशांची गरज भासते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी थोड्याफार प्रमाणात तरी पैसा असायला हवा. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, तेव्हा पैसाच कामाला येतो.

◆सतर्कता: तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल, तर कायम सतर्क राहायला हवं. काहीही करताना आपले डोळे-कान नेहमी खुले ठेवावेत.

◆कमजोरी: यशस्वी व्यक्तीने आपली कमजोरी कधीच कुणाला सांगू नये. जर तुम्ही तुमची कमजोरी कुणाला सांगितली तर तो तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊ शकतो.