कदम वाकवस्ती ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याला यश

लोणी काळभोर, दि. २८ सप्टेंबर २०२०: कदम वाकवस्ती ग्रामपंचायतला हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनी कडून CSR फंडातून कचरा गाडी व कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ९ कचराकुंड्या, व टिप्पर, टाटा कंपनीची गाडी असे अंदाजे ३९ लाख रुपये हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीने खर्च करून आज त्या गाडीचे उद्घाटन करून ग्रामपंचायत कदम वाकवस्तीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कचरागाडीचे उद्घाटन हिंदुस्तान पेट्रोलियमचे महाप्रबंधक अमर बागडे, व कदम वाकवस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी गाडीला हार घालून व नारळ, फोडून पूजा करून यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

मागील वर्षभरापासून सदर कंपनीकडे कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी कंपनीकडून व कंपनीचे उपमहाप्रबंधक अमर बी बागडे, हिंदुस्तान पेट्रोलियमच्या असिस्टंट मॅनेजर मेहक मॅडम, व विजय काळभोर, नितीन काळभोर, यांनी कचरा गाडीसाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. असे सरपंच गौरी गायकवाड यांनी बोलताना सांगितले आहे.

कचरा गाडीसाठी कदमवाक वस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच गौरी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देसाई, गुरुदेव जाधव, यांनीही कचरा गाडीसाठी सतत प्रयत्न केले आहेत. व कदम वाकवस्ती ग्रामपंचायतला अजून लागेल ती मद्दत आम्ही करू असे महाप्रबंधक अमर बागडे, यांनी बोलताना सांगितले आहे. व आज सर्वांच्या प्रयत्नांना यश आले व आज या गाडीचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे असे सामाजिक कार्यकर्ते चित्तरंजन गायकवाड यांनी सांगितले आहे.

यावेळी कदम वाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड व त्यांची टीम, कदम वाकवस्ती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम, कदमवाक वस्ती ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते चितरंजन गायकवाड, गुरुदेव जाधव, हिंदुस्थान पेट्रोलियमचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा