मंगळावर नासाच्या मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हरची यशस्वीपणे लँडिंग

युएस, १९ फेब्रुवरी २०२१: अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने १८ फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास मंगळ ग्रहावरील जेझेरो क्रेटर येथे मार्स पर्सिव्हरेन्स रोव्हर यशस्वीपणे उतरविला. यासह मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठविणारा अमेरिका जगातील पहिला देश ठरला आहे. हा रोव्हर मंगळावर पाठविण्याचा उद्देश म्हणजे प्राचीन जीवन जाणून घेणे. मंगळ ग्रहावरील दगड व मातीचे नमुने घेऊन पृथ्वी वर येणे.

जेझेरो क्रेटर हा मंगळाचा एक अत्यंत दुर्गम प्रदेश आहे. जेझेरो खड्ड्यात खोल दऱ्या, तीक्ष्ण पर्वत, डोंगर, वाळूचे ढिगारे आणि दगडांचा मोठा ढिगारा आहे. अशा परिस्थितीत जगातील शास्त्रज्ञ पर्सिव्हरेन्स मार्स रोव्हरच्या लँडिंगच्या यशाकडे डोळे लाऊन वाट पाहत होते. हे आतापर्यंतचे सर्वात अचूक लँडिंग असेल असे नासाने आधीच सांगितले होते. असा विश्वास आहे की जेझेरो क्रेटरमध्ये पूर्वी नदी वाहत होती. पुढेभौन ही नदी एका तलावाला जाऊन मिळत असावी. यामुळे तेथे पाणी वाहत असल्याचे निशाण तयार झाले आहे. या सर्व गोष्टी पाहता मंगळावर पूर्वी जीवन असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

नासाच्या शास्त्रज्ञांची दुसरी सर्वात मोठी चिंता म्हणजे मंगळच्या वातावरणात पर्सिव्हरेन्स रोव्हरची एन्ट्री, त्याचे डिसेंट व लँडिंग. या सर्व कामांना सुमारे ७ मिनिटे लागली. या सात मिनिटांसाठी नासाच्या वैज्ञानिकांनी श्वास रोखून धरला होता. कारण मंगळावर पर्सिव्हरेन्सच्या लँडिंग ची सर्व माहिती ११ मिनिट २२ सेकंद उशिराने पृथ्वीवर वैज्ञानिकांना मिळाली होती.

पहिला रोव्हर जो अणु उर्जासह मंगळाच्या पृष्ठभागावर धावेल

पर्सिव्हरेन्स मार्स रोव्हरचे वजन १००० किलो आहे. तर, इंज्यूनिटी हेलिकॉप्टरचे वजन २ किलो आहे. मार्स रोव्हर अणुऊर्जेसह चालणार आहे. याचा अर्थ असा आहे की, पहिल्यांदाच प्लूटोनियम रोव्हरमध्ये इंधन म्हणून वापरला जात आहे. हा रोव्हर मंगळावर १० वर्षे काम करेल. यात ७ फूट रोबोटिक आर्म, २३ कॅमेरे आणि एक ड्रिल मशीन आहे. ते मंगळाची छायाचित्रे, व्हिडिओ आणि नमुने घेतील.

भविष्यात मानव मंगळावर जगू शकेल की नाही हे समजेल

पर्सिव्हरेन्स मार्स रोव्हर आणि इंज्यूनिटी हेलिकॉप्टर मंगळावर कार्बन डाय ऑक्साईडपासून ऑक्सिजन बनविण्याचे कार्य करतील. हवामानाचा अभ्यास करेल. जेणेकरून भविष्यात मंगळावर जाणाऱ्या अंतराळवीरांना सुलभता होईल. रोव्हरमध्ये स्थापित केलेले मार्स एन्व्हायर्नमेंटल डायनेमिक्स एनालाइजर मंगळावर मनुष्य वस्तीयोग्य स्थितीत आहे की नाही ते सांगेल. यामध्ये तापमान, धूळ, हवेचा दाब व किरणोत्सर्जन इत्यादींचा अभ्यास केला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा