सतीश धवन अंतराळ केंद्रातून ISRO च्या PSLV-C53 चे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली , 1 जुलै 2022: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने 30 जून 2022 रोजी संध्याकाळी 6:02 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C53/DS-EO मिशनचं यशस्वी प्रक्षेपण केलं. हे प्रक्षेपण दुसऱ्या लॉन्च पॅडवरून करण्यात आलं. या मिशनचे काउंटडाऊन २४ तासांपूर्वी 29 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सुरू झाले होते. NewSpace India Limited (NSIL) चं हे दुसरं व्यावसायिक प्रक्षेपण आहे. यापूर्वी 14 फेब्रुवारी 2022 रोजी ISRO ने PSLV-C52/EOS-4 मिशन श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले होते.

दुसऱ्या लाँच पॅडवरून PSLV रॉकेटचे हे 16 वे उड्डाण होतं. बेंगळुरूस्थित दिगंतारा रोबस्ट इंजिनिअरिंग प्रोटॉन फ्लूरोसेन्स मीटर (ROBI) प्रोटॉन डोसीमिर पेलोड आणि ध्रुव स्पेस सॅटेलाइट ऑर्बिटल डिप्लॉयर (DSOD 1U) या रॉकेटसह पाठवण्यात आले आहेत. दोघेही स्टार्टअप कंपन्यांचे उपग्रह आहेत. या दोघांशिवाय 44.4 मीटर उंचीच्या PSLV-C53 रॉकेटमध्ये आणखी तीन उपग्रह असतील. हे रॉकेट पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या 570 किमी वरच्या कक्षेत उपग्रह तैनात करेल.

दिवस असो वा रात्र कोणत्याही हवामानात घेऊ शकतो फोटो

यामध्ये जे तीन मुख्य उपग्रह पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी DS-EO उपग्रह आणि NeuSAR हे दोन्ही उपग्रह सिंगापूरचे आहेत. NeuSAR हा SAR पेलोड असलेला सिंगापूरचा पहिला व्यावसायिक उपग्रह आहे. हे कोणत्याही हवामानात रात्रंदिवस फोटो काढण्यास सक्षम आहे. DS-EO उपग्रहाचे वजन 365 किलो आहे. तर NeuSAR हा उपग्रह 155 किलोचा आहे. तिसर्‍या उपग्रहाचे नाव स्कूब-1 आहे. सुमारे 2.8 किलो वजनाचा हा उपग्रह सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने बनवला आहे.

दोन भारतीय स्टार्टअप कंपन्यांचे उपग्रहही प्रक्षेपित

DS-EO उपग्रह आपत्ती निवारणात मदत करेल. स्कूब-1 हा सिंगापूरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला विद्यार्थी उपग्रह आहे. याशिवाय पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (पीओईएम) ही क्रिया पृथ्वीच्या कक्षेत पूर्ण केली जाईल. म्हणजेच चौथ्या टप्प्यातील PS4 ला ऑर्बिटल प्लॅटफॉर्म बनवले जाईल. PS4 मध्ये बसवलेल्या सोलर पॅनलमधून ऊर्जा मिळेल. त्याच्यावर चार सन सेन्सर बसवून तो हे काम करणार आहे. याशिवाय मॅग्नेटोमीटर, गायरो आणि नेव्हीसी यंत्रणाही त्यात तैनात करण्यात आली आहे. POEM मध्ये सहा पेलोड आहेत, त्यापैकी दोन भारतीय स्टार्टअप कंपन्यांचे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आहेत.

पीएसएलव्हीचे 55 प्रक्षेपण, फक्त दोन रॉकेट अयशस्वी

1993 पासून 54 PSLV रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले आहेत. हे 55 वे प्रक्षेपण होते. आतापर्यंत फक्त दोन रॉकेट फेल झाले आहेत. 1993 मध्ये पहिले PSLV-G आणि नंतर 2017 मध्ये PSLV-XL. पीएसएलव्ही रॉकेट हे इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट मानले जाते. याच रॉकेटने इस्रोच्या मार्स ऑर्बिटर मिशनला (MOM) मंगळावर आणि चंद्रयान-1 चंद्रावर पाठवलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा