तामिळनाडू, 14 जानेवारी 2022: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बुधवारी गगनयान कार्यक्रमासाठी क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी पात्रता चाचणी घेतली. तामिळनाडूमधील महेंद्रगिरी येथील इस्रोच्या प्रोपल्शन कॉम्प्लेक्समध्ये 720 सेकंदांच्या कालावधीसाठी ही चाचणी घेण्यात आली. गगनयान ही देशातील पहिली महत्त्वाकांक्षी मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, चाचणीच्या उद्देशांवर इंजिन यशस्वी ठरलं आहे. इंजिन पॅरामीटर्स संपूर्ण चाचणी कालावधीत सर्व पॅरामीटर्स योग्यरित्या जुळले. ही यशस्वी दीर्घ-कालावधीची चाचणी मानव अवकाश कार्यक्रम गगनयानसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
याशिवाय या क्रायोजेनिक इंजिनच्या एकूण 1810 सेकंदांच्या आणखी चार चाचण्या घ्याव्या लागतील, असं इस्रोने म्हटलंय. त्यानंतर, गगनयान कार्यक्रमासाठी क्रायोजेनिक इंजिन पात्रता पूर्ण करण्यासाठी इंजिनच्या दोन लहान कालावधीच्या चाचण्या तसेच एक दीर्घ कालावधीची चाचणी घेतली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे