ओडिशा, ४ ऑक्टोंबर २०२०: ओडिशाच्या बालासोर समुद्र टावर भारतानं परमाणु शस्त्र घेऊन जाण्यास सक्षम असलेले क्षेपणास्त्र शौर्य ची यशस्वीपणे चाचणी केली. शौर्य क्षेपणास्त्र हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. सरकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार, ओडिशातील भारतीय संरक्षण आस्थापनासाठी चीनकडून येणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे मोठं यश आहे.
अहवालानुसार, वैज्ञानिकांनी बालासोरमधील समुद्रकिनार्यावर शौर्य क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ८०० कि.मी. अंतरापर्यंत असलेल्या सर्व लक्षांना भेदू शकते. सरकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार या क्षेपणास्त्राचा अश्या वर्गात समावेश केला जाईल, ज्यामुळं देशाची संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होईल. अहवालानुसार सैन्य गरजा लक्षात घेऊन हे क्षेपणास्त्र तातडीनं समाविष्ट केलं जाईल. हे नवीन क्षेपणास्त्र जुन्या व्हर्जन पेक्षा हलकं व नियंत्रित करण्यास सोपं असणार आहे.
सूत्रांनी सांगितले की, जेव्हा हे क्षेपणास्त्र आपल्या लक्षात जवळ पोहोचलेलं असतं तेव्हा या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षाही जास्त असतो. म्हणजेच हाइपर्सोनिक वेगानं हे क्षेपणास्त्र प्रवास कर त व आपल्या लक्ष्याला भेदतं.
जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताची मागणी केली तेव्हापासून डीआरडीओ सामरिक महत्त्व देणारी क्षेपणास्त्र विकसित करण्यात व्यस्त आहे. या संदर्भात, डीआरडीओनं आपलं संशोधन आणि व्यावहारिक कार्यदेखील वाढविलं आहे. अलीकडंच भारतानं ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र ४०० किमी अंतरावर आपलं लक्ष्य नष्ट करू शकते. ब्राह्मोसची ही क्षमता जुन्या क्षेपणास्त्रांपेक्षा १०० किमी जास्त आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे