बाजारात अशी घसरण, रिलायन्स-टीसीएससह देशातील 10 मोठ्या कंपन्यांना मोठा धक्का

मुंबई, 24 जानेवारी 2022: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ज्याचे आकडे आता समोर आले आहेत. आकडेवारीवर नजर टाकली तर सर्वच कंपन्यांचे मार्केट कॅप कमी झालं आहे. शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या देशातील 10 मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झालीय. मार्केट कॅपनुसार, देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2.53 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

M-cap Top-10 कंपनी:

FPIs ने लार्ज-कॅप आणि सिलेक्ट मिड-कॅप I (मिड-कॅप) मध्ये प्रॉफिट बुक केल्यामुळं बेंचमार्क निर्देशांकात गेल्या आठवड्यात सुमारे 4 टक्क्यांची घसरण झाली. यादरम्यान, सेन्सेक्स 2,185.85 अंक म्हणजेच 3.57 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी 638.60 अंकांनी म्हणजेच 3.49 टक्क्यांनी घसरला.

मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

बाजारातील मंदीचा कल दर्शवत, गेल्या आठवड्यात देशातील टॉप-10 कंपन्यांचं एकत्रित मार्केट कॅप (एम-कॅप) 2,53,394.63 कोटी रुपयांनी घसरलं. कॉर्पोरेट प्रमुख रिलायन्स इंडस्ट्रीजचं एम-कॅप 40,974.25 कोटी रुपयांनी घसरून 16,76,291.69 कोटी रुपयांवर आलं.

दुसरीकडं, IT दिग्गजांना – TCS आणि Infosys Technologies – यांना त्यांच्या एकत्रित मार्केट कॅप मधून एकूण रु. 1,09,498.10 कोटींचं नुकसान झालंय. यासह, टीसीएसचे एम-कॅप वाढून 14,18,530.72 कोटी रुपये झालं तर इन्फोसिसचे 7,51,144.40 कोटी रुपये झालं.

झपाट्यानं घसरले बँक शेअर्स

याशिवाय, देशातील प्रमुख बँका एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांच्या मार्केट कॅप मध्ये 29,239.04 कोटी रुपयांची एकत्रित घट झालीय. HDFC बँकेचं मूल्यांकन 13,563.15 कोटी रुपयांनी घसरून 8,42,876.13 कोटी रुपये झालं. त्याच वेळी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चं मार्केट कॅप 4,863.91 कोटी रुपयांनी घसरून 4,48,729.47 कोटी रुपये झालं आणि ICICI बँकेचं मार्केट कॅप 10,811.98 कोटी रुपयांनी घसरून 5,58,699.39 कोटी रुपये झालं.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चं मूल्यांकन 9,938.77 कोटी रुपयांनी घसरून 5,45,622.08 कोटी रुपये झालं आणि बजाज फायनान्सचं मूल्यांकन 27,653.67 कोटी रुपयांनी घसरून 4,45,033.13 कोटी रुपये झालं. याशिवाय, HDFC चं मूल्यांकन 22,003.75 कोटी रुपयांनी घसरून 4,69,422.38 कोटी रुपयांवर आलंय.

त्याच वेळी, दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख भारती एअरटेलनेही बाजार मूल्यांकनातून 14,087.05 कोटी रुपयांची घसरण केली. यासह, भारती एअरटेलचं बाजार भांडवल 3,81,723.36 कोटी रुपये झालं.

टॉप-10 कंपन्यांच्या क्रमवारीत रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल आहे. त्यापाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा