कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला अचानक आग

कल्याण, दि.९ मे २०२०: कल्याण परिसरातील वाडेघर परिसरात असणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडवर साठलेल्या कचऱ्याला आज (शनिवारी) अचानक आग लागल्याचे चित्र पहायला मिळाले.

आगीची प्रखरता एवढी होती की, काही क्षणात आगीने मोठे रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे धुराचे मोठे लोट हवेत पसरल्याचे पहायला मिळत आहेत. हा परिसर खाडीच्या जवळ असल्याने वारे खूप आहे. त्यामुळे आग अजून पेटत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले.

आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जोरदार वारे असल्याने आग पसरू शकते, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

या अगोदरही या डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याचे पहायला मिळाले आहे. आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यातही यश आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीच्या काही वेळातच धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर आकाशात पसरल्याचे पहायला मिळाले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा