सूडभावनेतील न्यायामुळे न्यायाचे चारित्र्य संपते: सरन्यायाधीश बोबडे

नवी दिल्ली: न्यायाने कधीही सूडभावनेचे रूप घेऊ नये अन्यथा न्यायाचे चारित्र्य संपते, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.
जोधपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हैदराबाद एन्काउंटरच्या पार्श्वभूमीवर हे सूचक वक्तव्य केले आहे.

सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, न्यायाचं रुपांतर सुडात होता कामा नये. बदला घेण्यासाठी किंवा सूड म्हणून न्याय दिला जातो, तेव्हा न्यायाचं स्वरूप भ्रष्ट होतं.
न्यायप्रक्रियेतला विलंब टाळण्यासाठी आणि गुन्हेगारीची प्रकरणं लवकर निपटण्यासाठी न्यायव्यवस्थेत फेरबदल करणं गरजेचं आहे, यात शंका नाही.
पण याचा अर्थ न्याय तातडीने द्यायचा किंवा इन्स्टंट जस्टिस शक्य नाही. किंवा तसा तातडीचा न्याय असू ही नये.
दरम्यान, देशातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि न्यायव्यस्था यांच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांचे हे प्रतिपादन महत्वपूर्ण मानले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा