तंत्रज्ञानाचा वापर करुन उसाची शाश्वत शेती करणं गरजेचे ; आयुक्त शेखर गायकवाड

पुणे, १४ सप्टेंबर २०२० : साखर आणि ऊस उत्पादक या दोघांनीही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करुन उसाची शाश्वत शेती करणं गरजेचे आहे, असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काल व्यक्त केलं. तंत्रज्ञान हस्तांतरण संघटना, पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाना संघटना  आणि डेक्कन साखर तंत्रज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस तंत्रज्ञानावर आयोजित चर्चासत्रात ‘ऊसाच्या पिकाचे नियोजन करण्यात खेतीबडी तंत्राचा वापर’ विषयावर गायकवाड बोलत होते.
यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी आपले प्रश्न विचारून शंकानिरसन केले. कारखान्यांवरील गाड्यांची गर्दी, शेतकऱ्यांना उशिरा मिळणारे पैसे यावर नवीन तंत्रज्ञान शोधून तो लाभ तात्काळ कसा देता येईल, यावरही या क्षेत्रातील तंत्रज्ञ उपाय शोधत आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरण संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञ काम करत असून, त्यांनी पुढील ५० वर्षांच्या ऊसशेतीचे नियोजन केले तर फायद्याचे ठरेल.
या दोघांमध्ये समतोल साधण्याची जबाबदारी साखर आयुक्तालयावर आहे. डॉ. रिचा नायर यांनी कारखानदार आणि शेतकरी यांना साखर उद्योगाचे तांत्रिकीकरण करून जास्तीत जास्त लाभ कसा होईल, याबाबत चर्चा केली.
उसाचे उत्पादन, त्यात तंत्रज्ञानाचा वापर याविषयी त्यांनी सादरीकरणाच्या साहाय्याने उपयुक्त मार्गदर्शन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा