पुणे, २० फेब्रुवरी २०२१: उन्हाळ्याचे वातावरण म्हटलं की सर्वांना वाटते काही तरी थंड पोटात जावे. शिवाय कडक उन्हामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होत राहते. म्हणून आपण सतत काही ना काही पित राहतो. या ड्रिंक्स मध्ये आपल्या कडे सर्वात जास्त पसंती दिली जाते ती उसाच्या रसाला. त्याचेच काही फायदे आपण जाणून घेणार आहोत.
आजच्या काळात लोक बाहेर पडून काहीही अरबटचरबट खातात ज्या मुळे त्यांचे पित्त खवळते. पण, अश्या आजारावर उसाचा रस फार गुणकार ठरतो.तो आपल्या शरीरातील वाढलेली गर्मी संपवतो आणि आपलं पित्त संतुलित ठेवतो.
गर्मी मुळे घाम आणि थकवा हि एक सामान्य परिस्थिती चा त्रास हा आपल्याला होत आसतो. मात्र, जर तुम्ही उसाच्या रसाचे सेवन केले तर हा त्रास कायमचा मुळासकट नष्ट होऊ शकतो.
या व्यतिरिक्त कावीळ रोगावर अत्यंत लाभदायक असे उसाचा रस आहे. अनेकांना कावीळ झाल्यावर डाॅक्टर उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात. कारण त्या मुळे आपले लिव्हर आणि किडनी व्यवस्थित कार्य करु शकते.
त्यामुळे या पुढे तुम्हाला कधीही उन्हाळा लागला की उसाचा रस प्या आणि तंदुरुस्त रहा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव