ऊसतोड मजूरांनी कारखान्यांवर जाऊ नये- अशोक हिंगे

बीड, २० ऑक्टोबर २०२०: ऊसतोड कामगारांच्या मजुरीच्या दराबरोबरच मुकादम वाहतूकदार यांचे कमीशन वाढवून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कारखाना प्रशासनाने घ्यावी, अशा न्याय मागण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संपाची हाक दिलेली आहे. पंरतु काही जण जबरदस्तीने मजुरांना घेवून चालले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही कामगार लपून-छपून कारखान्यावर जात आहेत, त्यांची बिकट परिस्थिती आहे. पडत्या पावसात निवारा नाही, कुठलीही मदत नाही. ऊस तोडीचे कामही पावसामुळे सुरु करता येत नाही. तेव्हा अशा परिस्थितीत ऊसतोड कामगारांनी संप मिटत नाही, आपल्या न्याय मागण्या मंजुर होत नाहीत तो पर्यंत गाव सोडू नये.

जोपर्यंत नवीन करार होत नाही, ऊसतोडणीचा दरवाढ होत नाही, मजुरांच्या आरोग्याची हमी घेत नाहीत, तोपर्यंत ऊसतोड मजूर कामावर जाणार नाहीत अशी भुमीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. त्यामुळे कोणीही कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन वंचीतचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील) यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा