माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माढा तालुका अध्यक्ष पदी सुहास कांबळे

माढा, २३ ऑक्टोबर २०२०: स्वराज बहूउद्देशीय संस्थेद्वारा संचारत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माढा तालुका अध्यक्षपदी पिंपळनेर ता. माढा येथील जेष्ठ पत्रकार सुहास कांबळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मुंबई येथील कार्यालयातील घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारशीनुसार सर्वानुमते ही निवड करण्यात आली. केंद्रीय माहिती अधिकार २००५ हा जनसामान्यांचा कायदा असून या कायद्याचा वापर करून प्रशासन पारदर्शी, लोकाभिमूख व भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणे हा या माहिती अधिकारचा उद्देश आहे.

छायाचित्रणाच्या माध्यमातून पंचक्रोशीत सुपरिचित असलेले सुहास कांबळे हे गेल्या वीस वर्षांपासून दै. सकाळचे प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. आपल्या लेखणीतून अनेक शेतकऱ्याच्या व्यथा सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, शासनाच्या विविध रोजगारांच्या संधी मिळविणे. शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देणे तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

नेहरू युवा मंच, स्थानिक पत्रकार संघ, टेंभूर्णी शहर, ग्रामीण पत्रकार संघ, सुवर्णयुग प्रतिष्ठान, कुलस्वामिनी संस्कृतिक कला मंडळ, सोलापूर जिल्हा लोहार युवा महा संघ, महात्मा गांधी तंटामुक समिती आधीच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर याच्या मुख्य उपस्थित राज्य निवड समीतीने सुहास कांबळे यांची ही निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा