कोपरगाव, दि. ११ जुलै २०२०: तालुक्या मध्ये कोकणठाण भागातील एका तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव उज्ज्वला भगवान शेळके (वय २४) असे आहे.सादर घटना रात्री सुमारे अडीच वाजता घडल्याचे समोर अली.
घटने संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वला हिने शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरातील पडवीच्या लोखंडी बारला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. पोलिसांनी सांगितले कि कारण अद्याप अस्पष्ट आहे.सादर घटनेची माहिती उज्वला च्या वडिलांनी भगवान बाबुराव शेळके यांनी माहिती कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली. दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली.उज्वललाच मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.सादर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए. एम. दारकुंडे करीत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी