गोल पोस्ट महाराष्ट्र हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

अहमदनगर, २५ ऑगस्ट २०२० : अहमदनगर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशातच शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३२ वर्षीय कोरोनाबाधित युवकाने खाजगी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव गोरक्ष महादेव मतकर (वय ३२) असे असून पाथर्डी तालुक्यातील आहे.

त्याच्यावर मागील दहा दिवसांपासून शिरूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी रात्री तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

त्याने पहाटे सव्वातीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. सादर व्यक्तीवर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचार सुरु केले मात्र उडी घेतल्यामुळे गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version