मोहोळ, दि.३० मे २०२०: मोहोळ परिसरातील तांबोळे गावात लग्न जमत नसल्यामुळे ३५ वर्षीय इसमाने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील तांबोळे गावात घडली. २९ मे रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. सयाजी उर्फ सोन्या दत्तात्रय मोहिते (वय ३५ वर्षे रा. तांबोळे ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सयाजी उर्फ सोन्या मोहिते याचे गेल्या अनेक वर्षांपासून तो निराश होता. लग्न जमत नसल्याने त्याला दारुचेही व्यसन लागले होते. दिवसेंदिवस त्याच्यावरील तणाव वाढत होता. शेवटी गुरुवारी मध्यरात्री रात्री सर्वजण झोपले असताना घराच्या दरवाज्याच्या चौकटीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दि.२९ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोभू चव्हाण हे करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: