गोल पोस्ट गुन्हा डॉक्टर तरुणीची आत्महत्या! तीन महिन्यांआधी झाला होता प्रेमविवाह

डॉक्टर तरुणीची आत्महत्या! तीन महिन्यांआधी झाला होता प्रेमविवाह

औरंगाबाद,१० ऑगस्ट २०२२: औरंगाबाद जिल्ह्यामध्ये डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे‌. तीन महिनेआधी आंतरजातीय विवाह केलेल्या डॉक्टर तरुणीने इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून पाच दिवसांपूर्वी स्वतः रक्तवाहिनित इंन्सुलिनचे इंजेक्शेन घेतले होते. तेव्हा पासून गाठी रुग्णालयात उपचार सूरु होते.

मात्र उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यु झाला आहे. पोलीस ठाण्यात पती सासू-सासरे आणि दिराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टर तरुणीचे धनंजय मोरे या तरुणाशी तीन वर्षांपासून प्रेमसंबध होते. त्यानंतर दोघांनी लग्नही केले.

तीन महिन्यांच्या नंतर डॉक्टर तरुणी तणावाखाली पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीच्या खोलीत पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तिने असं लिहले आहे की ‘मम्मी पप्पा मला माफ करा.

तरुणीचे आई वडील व नातलग या घटनेनं धास्तावले आहे. सुसाईड नोटच्या आधारे औरंगाबाद पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनं परीसरात खळबळ माजली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version