कल्याणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची पाचव्या मजल्यावरुन आत्महत्या

कल्याण, दि. १९ जुलै २०२०: कल्याण डोंबिवली सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे एवढंच नाही तर रूग्णालयाबद्दल अनेक तक्रारींचा पाढा हा सततचा सुरूच आहे. मात्र कल्याण मध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन एका कोरोना रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव प्रशांत कुंडलिक आंबेकर असे आहे. तो डोंबिवली येथे राहणारा आहे. त्याला महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्हआल्याने त्याला टाटा आमंत्रा रुग्णालयात ९ व्या मजल्यावर रुम देण्यात आली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तो खोलीचा दरवाजा उघडत नसे. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तो दार उघडत व उपचार घेत नव्हता. हे पाहता आज डॉक्टरांनी मोठ्या अथक प्रयत्नांनी त्याला दार उघडण्यास भाग पाडले.

प्रशांतच्या या वागण्याने संभ्रमात पडलेल्या डॉक्टर व स्टाफने प्रशांतची खोली बदण्याचा निर्णय घेतला आणि त्याला ९ व्या नजल्यावरून ५ व्या मजल्यावर हलवण्यात येणार होते. ९ व्या मजल्यावरुन खाली येत असताना त्याने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. ही अनपेक्षीतपणे घडलेली घटना ही सर्वासाठी धक्कादायक ठरली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा