‘सुकन्या समृद्धी’ योजनेमुळे लेकीचे भविष्य आता सुरक्षित!

मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली सुकन्या समृद्धी योजना पालकांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. या योजनेत केवळ २५० रुपयांपासून ते १.५ लाख रुपयांपर्यंतची वार्षिक गुंतवणूक करता येते, जी मुलीच्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठी एक मोठा आधार ठरू शकते.

विशेष म्हणजे, या योजनेतील गुंतवणुकीवर सध्या ८.२% आकर्षक वार्षिक व्याज मिळत आहे आणि यावरील संपूर्ण परतावा करमुक्त आहे. मुलीचे वय १० वर्षांपेक्षा कमी असताना पालक तिच्या नावाने कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा निवडक बँकेत हे खाते उघडू शकतात. यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र आणि पालकाचे ओळखपत्र व रहिवाशी पुरावा अशी कागदपत्रे लागतात. मुलीच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असणाऱ्या प्रत्येक पालकासाठी ही योजना एक प्रभावी आणि सुरक्षित गुंतवणूक ठरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे