गोल पोस्ट इतर राजकारण सुकेश चंद्रशेखर यांचा केजरीवाल सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…

सुकेश चंद्रशेखर यांचा केजरीवाल सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले…

नवी दिल्ली, २० डिसेंबर २०२२; २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी आज दिल्लीस्थित पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात जॅकलीन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर हे उपस्थित होते. यावेळी सुकेश याने आम आदमी पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना सुकेशचे वकील अॅड. अनंत मलिक यांनी सांगितले की, सुकेश चंद्रशेखर याने कोर्टाला सांगितले की, त्याने आम आदमी पार्टीला ६० कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे. त्याच्या या खळबळजनक दाव्याची एका उच्चस्तरीय समितीने नोंद घेतली आहे. तसेच हे आरोप गंभीर असून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी शिफारसही यावेळी समितीतर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, या मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसच्या नावाचा देखील समावेश आहे. तिने सुकेश चंद्रशेखर याच्याकडून कार आणि घरासहित अनेक महागडे गिफ्ट स्विकारले असल्याचा तिच्यावर आरोप असून, ईडी आणि दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version