सुलेमानीला दफन करण्यापूर्वीच इराणने घेतला सूड

बगदाद : इराणचा जनरल कासिम सुलेमानीचा मृत्यू झाल्यापासून इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढत आहे. काल रात्री उशिरा बगदादमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेटचा जोरदार हल्ला झाला आणि केवळ दूतावासच नव्हे तर अमेरिकन सैन्याच्या तळावरही हल्ला झाला. या हल्ल्यात कोणी ठार झाल्याची कोणतीही बातमी नाही पण कासिम सुलेमानीवरील हल्ल्याशी त्याचा संबंध जोडला जात आहे. अद्याप या हल्ल्याची अधिकृतपणे कुणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.

खोमेनीची धमकी खरी ठरली                                                                                                इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचे सर्वात खास जनरल कासिम सुलेमानी यांच्या निधनानंतर ज्याचा अंदाज लावला जात होता तेच घडले. इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्र होण्याच्या अगोदर बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासात रॉकेट टाकण्यात आले. अमेरिकन दूतावासाच्या आत रॉकेटचा स्फोट झाला, यामुळे त्या भागात गोंधळ उडाला होता व पळापळ सुरू झाली. हा हल्ला होताच अमेरिकन सैन्याने कारवाईचा बडगा उगारला आणि बगदादवर अमेरिकन हेलिकॉप्टरची पेट्रोलिंग सुरू केली. बगदादच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकन सैन्याच्या तळावर रॉकेट हल्ले करण्यात आले. हा ग्रीन झोन एक अतिशय सुरक्षित ठिकाण आहे जिथे अमेरिकन दूतावास आहे. एक रॉकेट ग्रीन झोनच्या आत पडले तर दुसरे रॉकेट दूतावासाच्या अगदी जवळ जाऊन पडले झाला.

या भागात अमेरिकेचे दूतावास आहे ज्यामध्ये अमेरिकन सुरक्षा कवच सज्ज आहे, त्या बरोबरच बरीच सरकारी इमारती इथे आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नाही असे असतानाही येथे हल्लेखोरांना रॉकेट डागण्यात यश मिळविले. केवळ यूएस दूतावासच नव्हे तर बगदादपासून सुमारे ८० किमी अंतरावर असलेल्या बालाड एअरफोर्स तळावर दोन रॉकेट टाकण्यात आले. हा अमेरिकेच्या सुरक्षा दलांचा लष्करी तळ आहे. या दोन्ही हल्ल्यांमध्ये कोणतीही हानी पोहोचली नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा