पुरंदर, दि. ३० मे २०२०: पुरंदर मधील बोपगाव ग्रामपंचायतीच्या सरंचपदी सुमन सीताराम गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काल झालेल्या निवडणुकीत गोफणे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भामें यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
बोपगावचे माजी सरपंच सुरेखा फडतरे यांनी एक महिन्यापूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी राजाराम भामे यांनी काम पाहिले त्यांना तलाठी गणपत खोत व ग्रामसेवक सुभाष निंबरकर यांनी मदत केली.
निवडी नंतर नवनिर्वाचित सरपंच सुमन गोफणे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील विनायक गायकवाड, उपसरपंच रामदास फडतरे, शांताराम जगदाळे, दीपक फडतरे, रामभाऊ कदम, तुकाराम कदम, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तर यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे अजित माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे