गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा एन उन्हाळ्यात वन विभागातील पाणवठे कोरडेठाक

एन उन्हाळ्यात वन विभागातील पाणवठे कोरडेठाक

इंदापूर : वनक्षेत्रात वनविभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्य प्राणी संवर्धन तसेच विविध विकासकामांसाठी मिळत असला तरी केवळ वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे वन्य प्राण्यांसाठी पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.

इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्र आकाराने मोठे आहे.परिणामी वन्य प्राणी तसेच चिंकारा जातीच्या हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.मागील काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडेठाक पडले आहेत.परिणामी वन्य प्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्ती कडे वळत आहेत.हेच पाण्यासाठी भटकणारे प्राणी एखाद्या विहरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात.काहीवेळा तर पाण्याच्या शोधत निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे.तर काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होत आहेत.वनखात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने महाराष्ट्रातील वनात आढळणारे सांबर,चितळ, चिंकारा या जातीची हरणे आहेत.हरणांच्या या जाती वनविभागाच्या गलाथन कारभारामुळे आणि शिकारीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.तसेच सापमार गरूड,मोर,इ.देशी विदेशी पक्षी , विविध प्रकारच्या औषधी वनस्पती,फळाफुलांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.एकीकडे वनसंपदेचा होणारा ऱ्हास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे.आता त्यांचे हक्काचे घरंच सुरक्षित राहीलेले नाही.तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या गोठावली आहे.तसेच लाखो रुपये खर्चून वन्यजीवांच्या पाण्यासाठी असलेल्या सौर पंपांचा पुरता फज्जा उडाला आहे . इंदापूर तालुक्यांत वन्य जीव संरक्षणासाठी असलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे.

एन उन्हाळयात पुणे सोलापूर महामार्गावरील लोंढे वस्ती (ता.इंदापूर) नजीकच्या वनक्षेत्रातील पाणवठे कोरडेठाक पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकत आहेत.तर वन विभाग मात्र समतोल चार काढण्यात व्यस्त आहे.या काढलेल्या चारीमध्ये एखादा वन्यजीव पडून जखमी होण्याची दाट शक्यता आहे.तसेच वन्यजीवांसाठी ज्या योजना योजना राबवायला पाहिजेत त्याला फाटा इतर गोष्टींमध्ये त्यांचा रस असल्याचे देखील दिसत आहे.

खुद्द विद्यमान वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातील स्थिती अशी विदारक असल्याने पक्षीप्रेमी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

                                                                           

                                                                                                  प्रतिनिधी – योगेश कणसे

 

error: Content is protected !!
Exit mobile version