हक्कभंग समितीचे अर्णब गोस्वामींना समन्स

मुंबई, ३ मार्च २०२१: टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आला आहे. त्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना दुसऱ्यांदा विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हा हक्कभंग मागील अधिवेशनात दाखल केला होता.
त्यांना यापूर्वीही हक्कभंगाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र ते आजवर हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. आज बुधवारी (३ मार्च) अर्णब गोस्वामी यांना विधीमंडळात हजर राहाव्ह लागणार आहे.
बुधवारी सायंकाळी विधीमंडळात ५ वाजता हक्कभंग मांडण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सुनील प्रभू आणि आमदार प्रताप सरनाईक यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे. ७/११ अन्वय सुनील प्रभू अर्णब गोस्वामी आणि आमदार प्रताप सरनाईक साक्ष घेतली जाणार आहे. या अनुसार त्यांना नोटीस दिली आहे”, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली.
 न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा