सुनील गावस्करांनी दिला बाबर आझमला ऑटोग्राफ

12

ऑस्ट्रेलिया, १९ ऑक्टोबर २०२२ : टी-२० वर्ल्ड कप मध्ये भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत क्रिकेट समालोचनासाठी भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्करही पोहोचले आहेत. पाकिस्तानी संघाने गावस्कर यांना त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलावले होते. सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानी संघाला फलंदाजी-क्षेत्ररक्षणाच्या टिप्स दिल्या.

पाकिस्तानी टीमशी संवादानंतर गावस्कर यांनी कर्णधार बाबर आझमला टोपीमध्ये ऑटोग्राफ दिला. नंतर हस्तांदोलन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व विचारले की, तुझा वाढदिवस आज आहे की काल होता. बाबर ने त्यांचे आभार मानले आणि सांगीतले की, त्याचा वाढदिवस एक दिवस आधी होता.

गावस्कर यांच्यासोबत पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफही होते.

या सम्पूर्ण घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडियावर गावस्कर यांचे अभिनंदन होत आहे. तसेच सुनील गावस्करांना मान दिल्याने पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक ही होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे