गोल पोस्ट स्पॉटलाइट सनी लियोनने घेतली ‘ही’ लग्झरी कार

सनी लियोनने घेतली ‘ही’ लग्झरी कार

मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२०: बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री सनी लियोन हीला कारची खूपच हौस आहे. तिने नुकतीच इटालियन Maserati Ghibli कार खरेदी केली आहे.

सनी लियोनला या ब्रॅंडची कार सर्वाधिक पसंत आहे. यामुळेच तिच्याकडे Maserati क्वाट्रोपोर्टे आणि फेमस Maserati Ghibli नर्सिमा कारदेखील आहे.  सनी लियोनने आपल्या इंस्टाग्रामवर कारसोबतचा एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. यात ती व्हाईट कलरच्या Maserati Ghibli सोबत दिसते. सनीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, मला ही कार चालविल्यानंतर खूपच आनंद मिळतो. ही कार मी खरेदी केलेली आहे. सध्या सनीचा हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या फोटोला आतापर्यत तब्बल 1 लाख 85 हजारांहून अधिक लाइक्‍स मिळालेले आहेत. तसेच हजारांहून अधिक कमेंटस्‌ आल्या आहेत. या कारची भारतातील किंमत तब्बल 1 कोटी 31 लाखांपासून सुरू होते. तर अमेरिकेत 80 हजार यूएस डॉलर ऐवढी किंमत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version