मुंबई, १६ सप्टेंबर २०२१ : बुधवार हा शेअर बाजारासाठी उत्तम दिवस ठरला. ट्रेडिंग नंतर बाजार नवीन उच्चांकावर बंद झाला. ट्रेडिंग संपल्यावर सेन्सेक्स ४७६ अंकांनी वर चढून ५८,७२३ वर तर निफ्टी १३९ अंकांनी वाढून १७,५१९ वर बंद झाला. सेन्सेक्स-निफ्टीने नवा विक्रम नोंदविला.
बुधवारी ट्रेडिंगदरम्यान बाजारात मोठी रॅली होती. या दरम्यान, सेन्सेक्सने विक्रमी ५८,७७७ अंक आणि निफ्टीने १७,५३२ अंकांच्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. सकाळी सकाळी सेन्सेक्स ५८,३५४ वर आणि निफ्टी १७,३८७ वर उघडला होतं.
ट्रेडिंगदरम्यान, बँकिंग, आयटी, ऊर्जा शेअर्समध्ये खरेदी होती. धातू, ऑटोमोबाईल आणि फार्मा शेअर्समध्ये तेजी दिसून आली. दूरसंचार क्षेत्रातील संरचनात्मक बदलांच्या घोषणेने दूरसंचार कंपन्यांचे शेअर्स देखील तेजीत दिसले.
दुसरीकडे, बुधवारी, बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांची एकूण मार्केट कॅप प्रथमच २५९ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र, बाजारातील तज्ज्ञ आता गुंतवणूकदारांना सावध राहून गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. कारण बाजार विक्रमी उच्चांकावर ट्रेडिंग करत आहे.
शेअर बाजारात तेजीची अनेक कारणे आहेत. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरील चांगल्या संकेतांमुळे बाजाराला चालना मिळत आहे. तर महागाईच्या आघाडीवर लोकांना ऑगस्टमध्ये दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाई कमी झाली आहे. घाऊक महागाई देखील श्रेणीत आहे.
त्याचबरोबर जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन वाढले आहे. कोरोनाची प्रकरणे सतत कमी होत आहेत आणि लसीकरणाच्या तीव्रतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. तर शेअर बाजाराला दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांसाठी चांगले परिणाम अपेक्षित आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे