‘सुपर ओव्हर’ च्या नियमात झाला बदल

2019 क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेल्या वादानंतर आयसीसीने सुपर ओव्हरचा नियम बदलला आहे.

काय आहे निर्णय : वर्ल्ड कपच्या सेमी फायनल किंवा फायनलमध्ये सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील, असा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

का घेतला निर्णय?: 2019 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झालेली फायनल टाय झाली. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे जास्त बाऊंड्री मारलेल्या इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं.

‘या नव्या नियमामध्ये विरोधी टीमपेक्षा जास्त रन करणारा विजयी होईल, हे तत्व वापरण्यात आलं आहे,’ असं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

हा नियम केवळ सेमीफायनल आणि फायनल सामन्यांसाठीच असेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा