ब्रिटन आणि कॅनडा मधूनही भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

ब्रिटन, १ डिसेंबर २०२०: मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा निषेध सहाव्या दिवशीही सुरू आहे. पंजाबमध्ये दोन महिन्यांपासून निदर्शनं झाल्यानंतर शेतकरी आता दिल्लीकडं वळाले आहेत. सर्व शेतकरी संघटनांची समान मागणी आहे की सरकारनं किमान आधारभूत किंमतीबाबत (एमएसपी) ठाम वचन दिलं पाहिजे आणि त्याचा कायद्यात समावेश करावा. बाजारातून बाहेर पडताच एमएसपीवर परिणाम होईल आणि हळूहळू संपंल अशी भीती शेतकरी संघटनांना आहे. पंजाबमधील शेतकरी चळवळीबरोबरच इतर बऱ्याच राज्यांतील शेतकरीही हळूहळू सामील होत आहेत, तर या निषेधाला ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेतील बर्‍याच खासदारांचा पाठिंबा मिळत आहे.

ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार आणि रेल्वेमंत्री तन्मंजीत सिंह यांनी ट्वीट केले की, शेतकरी हे अशा प्रकारचे लोक आहेत जे आपल्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांना सुद्धा दिवसरात्र परिश्रम करून अन्न पुरवतात. मी पंजाब आणि भारतातील इतर राज्यांतील शेतकरी तसेच माझे ते सर्व मित्र आणि त्यांचे कुटुंब जे शेतकरी विरोधातल्या या कायद्याचा विरोध करत आहे त्यांच्या समवेत मी उभा आहे.

लेबर पार्टीचे खासदार जॉन मैकडोनल यांनी तनमनजीत सिंह यांचं समर्थन केलं आणि लिहिलं की, जे शेतकरी शांततेत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रदर्शन करत आहे त्यांच्या विरोधात दमनकारी कारवाई करण्याचा मी निषेध करतो. सरकारचं असं वागणं भारताच्या प्रतिमेला खराब करत आहे

लेबर पार्टीच्या आणखी एक खासदार प्रीत कौर गिल यांनी ट्विट केलं असून त्यात दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन करण्यासाठी सरकार कशाप्रकारे त्यांना थांबवत आहे याबाबत छायाचित्रे शेअर केली. आपल्या उपजीविकेवर प्रभाव पाडणार्‍या ह्या कृषी विरोधाच्या कायद्याला शेतकरी शांततेनं विरोध करत असताना देखील सरकार त्यांच्यावर वॉटर कॅनननं पाण्याचा मारा करत आहे तर काहीवेळा अश्रुधुराचा देखील वापर करत आहे. त्या म्हणाल्या की, भारतात या शेती विरोधी कायद्याचा शांतीपूर्ण निषेध केला जात असताना देखील सरकार कडून शेतकऱ्यांना दिली जाणारी ही वागणूक आक्षेपार्ह आहे.

कॅनडामध्येही भारताच्या नवीन कृषी कायद्याची चर्चा आहे. कॅनडामध्ये जगमित सिंग यांच्या नेतृत्वात न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार याबाबत अधिक चर्चा करत आहे. न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख जगमीत सिंह यांनी ट्विट केलं की, शांततापूर्वक प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांना भारत सरकार कडून होत असणारा हा विरोध नुकसानकारक आहे. मी पंजाब आणि भारतातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. मी भारत सरकारला हिंसेऐवजी शांततेच्या मार्गानं वाटाघाटी करण्याचा सल्ला देतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा