एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दिल्ली, ५ जून २०२३ : रिलायन्स उद्योगसमूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या ऑटिलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवण्याबरोबरच उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले मुंबईचे माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन दिला आहे. आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी जामीन दिला जावा, असे शर्मा यांनी याचिकेत म्हटले होते. त्यानुसार तीन आठवड्यांसाठी त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.

‘इनकाउंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेल्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली होती. ऑटिलियासमोर बाँम्ब ठेवल्याच्या तसेच हिरेन हत्या प्रकरणात आपण निर्दोश आहोत, असा जबाब शर्मा यांनी न्यायालया समोर दिला होता. मुंबई पोलीस दलात १९८३ साली उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले शर्मा हे तीनशेपेक्षा जास्त इनकाउंटरमध्ये सामील होते. यातील ११३ इनकाउंटर त्यांच्या नावावर आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा