नवी दिल्ली, १० जुलै २०२३ : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी, सीबीआय आणि ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीला स्थगिती देण्याच्या विनंतीची, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे.
कोलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणी अभिषेक यांच्या चौकशीचे निर्देश दिले होते. याबाबत दिलासा हवा असेल तर परत कोलकाता उच्च न्यायालयात जावा, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली आहे. ईडीने समन्स पाठवूनही अभिषेक बॅनर्जी यांनी हजर राहण्यास नकार दिला होता.
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या जन संयोग यात्रेत सामील असल्याने आपण कोलकात्याच्या ईडी कार्यालयात हजर राहू शकत नाही, असे कारण त्यावेळी अभिषेक बॅनर्जी यांनी दिले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर