नवी दिल्ली, १ ऑगस्ट २०२३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना मानण्याचा आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने या निर्णया विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
वरिष्ठ अधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही या खंडपीठात समावेश आहे. जम्मू-काश्मीरबाबत घटनापीठाच्या निकालाची वाट पाहू आणि तारीख देऊ, असे खंडपीठाने म्हटले आहे.
या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, निवडणूक आयोगाने दहाव्या अनुसूची अंतर्गत अपात्रता ठरवण्याबाबत चूक केली आहे. त्यात म्हटले आहे की, शिवसेनेत फूट पडली असे मानून निवडणूक आयोगाने चूक केली. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली होती आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाला देण्याचे आदेश दिले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड